लातूर पोलिसांची कारवाई
लातूर : पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात लातूर पोलीस दलाकडून अवैद्य धंद्याविरुद्ध लातूर शहर व जिल्ह्यात कडक मोहीम राबविण्यात येत आहे. अवैद्य धंद्याविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या कडक कारवाईचाच भाग म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी उप विभागीय पोलीस आधिकारी, चाकूर यांच्या पथकाला अतिरिक्त एमआयडीसी लातूर येथे अवैद्यरीत्या बनावट गुटखा बनविण्याचा कारखाना चालू असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीची खात्री करून ASP बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शना खालील पोलिस पथकाने २८ मे रोजी लातूर येथील अतिरिक्त एमआयडीसीमधील कोंबडे ऍग्रो एजन्सी या वेअर हाऊसवर छापा टाकला. छाप्यामध्ये बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल सुपारी, तंबाखू पावडर, मिक्सर, सिलिंग करणाऱ्या मशीन, गोवा 1000 असे छापील पॅकिंग साहित्य, बनावट गुटखा, एक ट्रक व एक पिक अप असा एकूण 03,05,73,400/- रुपये (तीन कोटी पाच लाख त्र्याहत्तर हजार चारशे रुपये) किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी १) अंकुश रामकिशन कदम, वय 32 वर्षे रा रामवाडी ता चाकूर २) हसनकुमार तिलाही उराम व 21 वर्षे राहणार शाहबगंज राज्य बिहार, ३) गोकुळ धनराम मेघवाल रा चुवा, राज्य राजस्थान, ४) धनंजय गहिनीनाथ कोंबडे, रा. लातूर, ५) पारस बालचंद पोखरणा, रा लातूर, ६) राम केंद्रे, रा. लातूर व ७) विजय केंद्रे, रा लातूर यांच्याविरुद्ध MIDC पोलिस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, हेड कॉन्स्टेबल विष्णू गुंडरे, पोना अनंतवाड, पोलिस काँस्टेबल कांबळे, धडे, गाडेकर, शिंदे, पेद्देवाड, रायबोळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजाविली.